जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी

जळगाव,प्रतिनिधी । जिल्हा पोलिस दलातील एक अधिकारी आणि सहा कर्मचारी कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले आहे, त्यात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यु ओढवला आहे. फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्‍यता असल्याने आता प्रत्येक कर्मचाऱ्याचे कामावर आल्यानंतर सक्रिनींग आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येवून नोंद घेण्यात येत आहे.

जळगाव जिल्हा पोलिस दलात साडेतीन हजार कर्मचारी विवीध ३४ पोलिस ठाण्यासह मुख्यालय, अधीक्षक कार्यालय नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येने सहाशेचा टप्पा ओलांडला असून कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. फैजपुर पोलिस ठाण्यात कार्यरत अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असून गेल्या आठवड्यात दक्षतानगर पोलिस लाईनीत तीन कर्मचारी बाधीत आढळून आले होते. त्यानंतर कालच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून दोन दिवसांपुर्वी भुसावळच्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.पोलिस ठाण्यासह विवीध ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला असून आता कामावर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्क्रीनींग करण्यात येत असून प्रत्येक पोलिस ठाण्यात लेझर स्क्रिनींगद्वारे तापमानाची नोंद घेतली जात आहे. आज पोलिस ठाणे निहाय प्रत्येक कर्मचाऱ्याची स्क्रिीनींग आणि ऑक्‍सीमिटरद्वारे मोजणी करुन त्याच्या नोंदी वरीष्ठांना पाठवण्यात आल्या आहेत. लक्षणे आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ उपचारसाठी पाठवण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिल्या आहेत.

Protected Content