घरकुल घोटाळ्यातील गुलाबराव देवकरांच्या शिक्षेच्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील बहुचर्चीत असलेल्या घरकुल प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचीका पवन नारायण ठाकूर यांनी दाखल केली आहे.

ही स्थगिती चुकीची असल्याच्या मुद्यावर पवन ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मंगळवारी न्यायमूर्ती न.नागेश्वर राव व अजय रस्तोगी यांच्या द्वीपाठाने ही याचिका दाखल करुन घेत देवकर व राज्य शासनाला नोटीसा बजावून २६ आॅक्टोबर रोजी म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. जळगाव घरकुल प्रकरणात ३० आॅगस्ट २०१९ रोजी धुळे न्यायालयाने गुलाबराव देवकर, सुरेशदादा जैन यांच्यासह ४८ जणांना शिक्षा सुनावली होती. देवकर यांना ५ वर्ष कारावास व पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. २७ जानेवारी २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने देवकारांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.

Protected Content