बाबरी मशिद प्रकरणात अयोध्येतील कारसेवक निर्दोष मुक्त झाल्याने जळगावात भाजपाचा आनंदोत्सव

जळगाव प्रतिनिधी । गेल्या २८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील बाबरी मस्जिद उध्वस्थ केल्याच्या आरोपातून कार सेवकांना आज कोर्टाने निर्दोष मुक्त केल्याने या निकालाचा आनंदोस्तव संपूर्ण देशभरात करण्यात येत असून याच अनुसंघाने भाजपा जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने आनंदउत्सव साजरा केला.

सायंकाळी जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत जनतेला व कार्यकर्त्यांना लाडू वाटप करून जय श्रीरामाच्या जय घोषाने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी नागरिकांना व कार्यकर्त्यांना पेढे भरविले. याप्रसंगी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सभापती अॅड.सुचिता हाडा, गटनेते भागात बालानी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, शुभाश सोनवणे, सुशील हासवाणी, राजू मराठे, राहुल वाघ, महेश चौधरी, उज्वलाताई बेंडाळे, महिला अध्यक्षा दिप्तीताई चिरमाडे, ज्योती ताई राजपूत, सौ.नील ताई चौधरी, पर्वताताई भिल, मनोज भांडारकर, गणेश माळी, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, नगरसेवक जितेंद्र मराठे, धीरज सोनवणे, दिनेश सोनवणे, मंडल अध्यक्ष विनोद मराठे अशोक राठी, किशोर चौधरी, निशिकांत मंडोर, किशोर भंडारी, अनिल जोशी, माधू सोनवणे, जयेश भावसार, अनिल जोशी, प्रवीण जाधव, युवामोर्चा पदाधिकारी, अक्षय जेजुरकर, प्रतिक सेठ, गौरव पाटील, जयंत चव्हाण ई. उपस्थित होते.

Protected Content