Home Cities भुसावळ अपक्ष उमेदवार सतीश घुले यांचे ठिकठिकाणी स्वागत

अपक्ष उमेदवार सतीश घुले यांचे ठिकठिकाणी स्वागत

0
101


satish ghule

भुसावळ प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी करणारे सतीश घुले यांनी जोरदार प्रचारफेर्‍यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.

सतीश घुले यांनी पहिल्यापासूनच ग्रामीण आणि शहरी भागात जोरदार प्रचार सुरू केला आहे. आता प्रचार अंतीम टप्प्यात येत असतांना त्यांनी जोर लावल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आपली उमेदवारी असून विकासाच्या या भूमिकेला जनतेची पसंती मिळणार असल्याचा आशावाद ते प्रचारफेर्‍यांमध्ये व्यक्त करत आहेत.


Protected Content

Play sound