…तर ‘गब्बर सिंग टॅक्स’ रद्द करणार- राहूल गांधी

इटानगर वृत्तसंस्था । केंद्रात सत्तांतर झाल्यास गब्बर सिंग टॅक्स अर्थात जीएसटी रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा आज काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली.

जीएसटीला काँग्रेसने आधीपासून विरोध केला आहे. राहूल गांधी यांनी आधीच जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असल्याची टीका केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज अरूणाचलमधील सभेत त्यांनी आपला पक्ष सत्तेवर आल्यास जीएसटी रद्द करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, नव्या प्रणालीत पाच स्लॅब नसून एकाच प्रकारे कर आकारणी करण्यात येईल. गब्बर सिंग टॅक्समुळे देशातील मध्यम आणि लहान व्यापारी व उद्योजक देशोधडीला लागल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Add Comment

Protected Content