रायसोनी मॅनेजमेंटतर्फे 22 रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । येथील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात 22 मार्च रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलते उद्योग व्यवसाय या मुख्य विषय सहा प्रमाणावर विषयांवर शोध निबंध सादर करण्यात येणार आहेत. या परिषदेत शिक्षण विभागातून प्राध्‍यापक, स्कॉलर विद्यार्थी व उद्योग क्षेत्रातील संबंधित संशोधक, शोध निबंध सादर करणार आहेत. तसेच एकूण 60 शोधनिबंधांत पैकी 50 शोधनिबंधांची यू.सी.जी.मानांकित जनरलमध्ये प्रकाशनासाठी निवड करण्यात आली आहे.

आयोजित परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून सिनिक टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे सीईओ निरंजन भटवाल तसेच कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल. प्राचार्य डॉ. ए.जी.मॅथ्यू, संयोजक प्रा. मकरंद घाठ, प्रा.रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. भारत तंत्रज्ञान वापरात अग्रेसर व्हावा तसेच तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता पायाभूत सुविधांमध्ये होणारे बदल आणि सुधारणा लक्षात घेणे ग्राहक व व्यवसायिक या दोन्हींमधील व्यवहारिक देवाण-घेवाण आतील वाढणारी गती निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेणे, सोबत समाजात होणारे तांत्रिक बदल प्रत्येकाला अभ्यासता यावेत या हेतूने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय परिषदेत औद्योगिक 1. नवीन रस्ता आणि उद्योजक 2. प्रभावी विपणन 3. मानव विकास 4. अर्थ जगतातील आव्हाने 5. माहिती व संवाद तंत्रज्ञानातील व्यवस्थापन 6. अभियांत्रिकी आणि विज्ञान या विषयातील विविध अभ्यासपूर्ण शोधनिबंध यावेळी सादर होणार आहे.

तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे देशाच्या विकासात भर पडत आहे, कामाची गती वाढत आहे. ऑटोमेशनमुळे कामाच्या पद्धती बदल्यात त्यामुळे जीवनात प्रत्येक व्यक्तीला एक कौशल्य शैलीवर अवलंबून राहून चालणार नाही तर त्याला विविध कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे. जगातील बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव सामाजिक जीवनावर पडत असतो. त्यामुळे या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञानातील होणारे बदल जाणून घेण्यासाठी हा प्रयत्न आहे. यावेळी पुणे, नागपूर, दिल्ली, मणिपाल विद्यापीठ, उदगीर, जयपुर, बेंगलोर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांचा समावेश राहणार आहे. तरी आयोजित राष्ट्रीय परिषदेत जास्तीत जास्त प्राध्यापक स्कॉलर विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संचालिका डॉक्टर प्रीती अग्रवाल यांनी केलेले आहे.

Add Comment

Protected Content