मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव मालवाहू वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने जुनेजळगावातील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एमआयडीसीत घडली. जखमी झालेल्या व्यक्तीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दिपक शरद खडके (वय-४१) रा. जुने जळगाव, असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिपक खडके हे जुने जळगावातील रहिवासी आहेत. रविवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दिपक खडके हे त्यांच्या दुचाकी (एमएच १९ एजी ५९३४) ने एमआयडीसीतील ‘के’ सेक्टरमध्ये काम आटोपून घरी परतत असतांना रेमंड चौफुलीतील भारत गॅसकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असतांना समोरून मालवाहू वाहन (एमएच १९ सीवाय २०९७) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दिपक खडके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content