जळगाव (प्रतिनिधी) यावल लगत सातपुड्यातील जामुनझिरा येथील एका बौध्द भिक्कुच्या कुटी नजीक लावण्यात आलेले बोधी वृक्षाची अज्ञात समाजकंटकाने तोडल्याच्या निषेधार्थ आज महाकारूणिक बुद्ध बहुउदेशिय संस्थेचे वतीने जिल्हाधिकारीना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भंतेजी नागसेन व भंतेजी अरण्य महानाम उपस्थित होते.
भंते महानाम हे जामुनझिरा ठिकाणी भरपुर दिवसा पासून राहत आहेत. याठिकाणी त्यांनी आपल्या कुटी समोर बोद्धगया येथून आणलेले बोधीवृक्ष लावले होते. त्यामुळे जिल्ह्यासह जवळच्या खेडया पाडयातील बौद्ध उपासक, उपासीका त्या ठिकाणी दर बुद्ध पौर्णिमेला खुप मोठ्या संख्येने आनंदाने श्रध्देने वंदना करत होते. २१ मे रोजी अज्ञात समाज कंटकाने ते बोधीवृक्ष तोंडले आहे. तरी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन भंतेजी नागसेन (धरणगाव) यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच लवकर कारवाई न झाल्यास भिक्कू संघ न्यायासाठी धम्म क्रांती करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भंते अरण्य महानाम, भंते नागसेन, भंते सुमनतिस व उपासक भुषण शिवाजी साळुंखे उपस्थित होते.
https://www.facebook.com/watch/?v=716098965824958