भुसावळ, प्रतिनिधी । जामनेर येथील चोरीतील फरार आरोपी जितेंद्र गोडले यास भुसावळ शहरातुन टिंबर मार्केट परीसरातुन बाजार पेठ पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यास पुढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर येथील बळीराम जयराम माळी (वय – 75 रा.गिरीजा कॉलनी जामनेर) यांच्या घरात जबरी चोरी करुन आरोपीनी ११ लाख ४४ हजार ५६२ रुपये चोरुन नेले होते. जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात फरार आरोपी जितेंद्र ऊर्फ (जितु) किसन गोडले (वय – 27 रा.जामनेर रोड वाल्मीक नगर भुसावळ) याचा शोध घेण्याचं भुसावळ पोलिसांना कळविले होते. .पो.निरी.दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भुसावळ शहरातुन टिंबर मार्केट परीसरातुन जितू गोडले यास गुरुवार ६ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ लोहमार्ग , सावदा , जामनेर पोलीस ठाण्यातही विविध गुन्हे दाखल आहेत. त्यास पुढील तपासासाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पो.ना रविंद्र बि-हाडे,रमन सुरळकर,महेश चौधरी पो.कॉ कृष्णा देशमुख विकास सातदिवे ,प्रशांत परदेशी यांनी केली .