राष्ट्रीय महामार्गावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन आदिवासी बांधव हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पारोळा गावानजीकच्या म्हसवे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन आदिवासी बांधव जखमी झाल्याची घटना गुरुवारी६ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे तर कार मधील एअर बॅग उघडल्याने दोन जण बचावले आहे. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या दोघांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच रस्त्यावरील अपघात अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान या घटनेत जखमी झालेले दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Protected Content