जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि महापालिकेतील मनुष्यबळ लक्षात घेता शहर महानगरपालिकेच्या समन्वय अधिकारीपदी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे आणि किरण देशमुख यांच्याकडे मनपा उपायुक्ताचा अतिरिक्त पदभार सोविण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज काढले.
जळगाव महानगरपालिकेत तीन उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली होती. टप्प्याटप्याने तिनही आयुक्तांची बदली इतर ठिकाणी झालेली आहे. सध्या महापालिकेत एकही उपायुक्त उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान जळगाव शहरात कोरोना विषाणूची फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून आटोक्यात आणण्यासाठी सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी युध्दपातळीवर करण्यात येत आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल प्रशानाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांची जळगाव महानगरपालिका क्षेत्राकरीता समन्वय अधिकारी म्हणून तर नगरपालिका शाखेच्या जिल्हा प्रशासन अधिकारी किरण देशमुख यांची मनपा उपायुक्तपदा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत देण्यात आले आहे.