महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होणार ऑनलाईन महासभा (व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी । कोरोनाची साथ असल्याने गेल्या चार महिन्यांपासून एकही महासभा घेता आलेली नाही. महासभा नसल्याने शहरातील विविध प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. कोरोनामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव ऑनलाईन महासभा घेण्याचे निश्चित करण्यात आले असून शनिवारी महापौर सौ.भारतीताई सोनवणे यांच्या उपस्थितीत सभेचा डेमो घेण्यात आला.  दरम्यान, एरव्ही होणाऱ्या गोंधळाच्या महासभेसारखा गोंधळ ऑनलाईन महासभेत अनुभवायला मिळणे अशक्य आहे कारण की, कुणाला बोलण्याची संधी द्यावी याचे बटन महापौरांच्या हातात असणार आहे.

मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात घेण्यात आलेल्या डेमो महासभेला महापौर सौ.भारतीताई सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन लढ्ढा, नितीन बरडे, सदाशिव ढेकळे, राजेंद्र घुगे, एमआयएमचे रियाज बागवान, नवनाथ दारकुंडे, प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, विशाल त्रिपाठी, सुनील खडके, चेतन सनकत, सचिन पाटील, ऍड.दिलीप पोकळे आदी उपस्थित होते.

सभेचे प्रास्तविक नगरसचिव सुनील गोराणे यांनी केले तर अमित मनोरे, फहीम शेख यांनी गुगल मीट वापराविषयी सविस्तर माहिती दिली. सर्वपक्षीय सदस्यांनी ऑनलाईन महासभेविषयी प्रत्येक सदस्याला माहिती होण्यासाठी प्रभागनिहाय सदस्यांची डेमो बैठक घेण्याची सूचना केली.

माहिती पुस्तिका देणार, संदेश पाठवण्याची संधी
गुगल मीटद्वारे ऑनलाइन महासभा किंवा स्थायी समिती सभेत कसे सहभागी व्हावे, अँपचा उपयोग कसा करावा याबाबत सविस्तर माहिती देणारी पुस्तिका प्रत्येक सदस्याला दिली जाणार आहे. सभेत जर एखाद्याला आपला मुद्दा मांडायचा असल्यास त्यांना हँड राईज ऑप्शनने हात उंचवावा लागणार आहे. महापौरांनी बोलण्याची संधी न दिल्यास सदस्य संदेश पाठवू शकणार आहे.

रेकॉर्डिंगच्या आधारे नोंद होणार इतिवृत्त
जळगाव मनपाची महासभा आणि स्थायी समिती सभापती ऑनलाइन घेण्यात येणार आहे. ऑनलाईन सभेचे संपूर्ण रेकॉर्डिंग केले जाणार असून त्याच्या आधारे इतिवृत्त नोंद केले जाणार आहे. मुख्य सभेच्या दोन दिवस अगोदर देखील डेमो सभा घेण्यात येणार आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/209480363774698/

 

Protected Content