पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रमात २५ टक्के कपात !

मुंबई (वृत्तसंस्था ) पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्के कपातसीबीएसईने ३० टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आता शिक्षण विभागानेही पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्के कपात करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

 

एकीकडे शाळा बंद आहेत, तरी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून हे शिक्षण देत असताना त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यात अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, याबाबत प्रश्न विद्यार्थी शिक्षकांना पडलेला पाहायला मिळत होता. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोना संकटाच्या काळात आपण १५ जूनपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग आपण सुरू केले आहेत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Protected Content