नवोदय विद्यालय व भास्कराचार्य मॅथ सिटीची स्थापना करावी- खा. पाटील

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघात नवोदय विद्यालय आणि चाळीसगावातील पाटणादेवी परिसरात भास्कराचार्य यांच्या नावाने मॅथ सिटी सुरू करण्याची मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत केली.

खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत नवोदय विद्यालय आणि मॅथ सिटीबाबत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता जळगाव मतदार संघात नवोदय विद्यालयाची स्थापना गरजेची आहे,. तसेच चाळीसगाव जवळील गौताळा अभयारण्यात पाटणादेवी मंदिर असून तेथे शून्याचा शोध लावणारे भास्कराचार्य यांच्या नावाने मॅथ सिटी स्थापन करावी. देशातील ही एकमेव मॅथ सिटी सुरू झाल्यास भास्कराचार्यांच्या कार्याचा प्रसार आणि गौरव होईल.

यासोबत खासदार पाटील यांनी १०० वर्षांची परंपरा असलेल्या अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र या दुर्लक्षित केंद्राला सरकाराने अनुदान द्यावा. एवढेच नव्हे, तर हा अभ्यासक्रम जगासमोर कसा येईल? यासाठी वेगळे प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

Protected Content