संत्रीच्या झाडांची लागवड करून डॉ. वैभव पाटलांचा वाढदिवस साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाकडून नागपुरी  संत्रींच्या झाडाची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे  गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी कौतुक केले.

 

डॉ.वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.  या महाविद्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या हर्टीकल्चर फार्मचे डायरेक्टर प्रा.सतिष सावके  यांनी नागपूरच्या संत्रीचे लागवड केली आहे. या उपक्रमाचे गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी कौतुक केले. यात त्यांनी प्रा. सावके यांचे हजार संत्र्यांचे झाडे लावण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करत संत्र्यांचे झाडे लावण्याचे त्यांचे तंत्र वेगळे असल्याचे सांगितले. यासाठी ते स्वतःचा फार्मुला उपयोगात आणत आहे. विदर्भाच्या संत्र्यांपेक्षा आम्ही  प्रा. सावके यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेले आहेत. डॉ. वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. सावके यांनी राबविलेल्या उपक्रमाचे डॉ. उल्हास पाटील यांनी  कौतुक करत त्यांचे अभिनंदन   केले.

 

Protected Content