आदिवासी मुलं शिक्षणापासून वंचित; शासनाचे दुर्लक्ष

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील आदिवासी एकात्मीक प्रकल्प विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील आदिवासी मुलांना प्राथिमक शिक्षणापासून वंचीत रहावे लागत आहे. मुलांना शाळेत प्रवेश न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा आदिवासी जेष्ठ नागरीक व सामाजिक कार्यकर्ते मुनाफ तडवी यांनी दिला आहे.

 

यासंदर्भात मुनाफ तडवी यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे निवेदन देवून मागणी केली आहे. दिलेल निवेदनात म्हटले आहे की, आदीवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत या २०२२ ते २३ वर्षासाठी आदीवासी मुला मुलींना मोठ्या शिक्षण संस्थामध्ये इंग्रजी माध्यमातुन पाहिली व दुसरीपासून प्रवेश दिला जातो. आदीवासी प्रकल्प कार्यालयाने यावर्षी देखील, जाहीरात देवुन सर्व आदीवासी बांधवांना मुला मुलीसाठी शैक्षणीक लाभ घेण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने अनुषंगाने विद्यार्थ्यांचे प्रवेश फार्म देखील स्विकारले आहे. असे असतांना या वर्षाचे विद्यार्थ्यांचे पहीले शैक्षणीक सत्र संपण्यात आले आहे. लवकरच दुसऱ्या शैक्षणीक सत्राची सुरुवात होणार आहे. तरी देखील आदीवासी प्रकल्प कार्यालया मार्फत कोणत्याही शैक्षणिक हालचाली केलेल्या होत नाही.

 

आदिवासी  प्रकल्प कार्यालयाने आदिवासींच्या मुलामुलींच्या शैक्षणिक विषयाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षणापासुन वंचीत राहावे लागेल तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर दुसऱ्या ठिकाणी प्रवेश घेण्याची मुद्दत देखील राहीलेली नाही.  आदिवासी प्रकल्प विभागाच्या माध्यमातुन कार्यक्षेत्रातील येणाऱ्या सर्व आदिवासी पालकांनी आपल्याकडे पाल्यांसाठी प्रवेश मागीतले आहे. त्या सर्व पालकांच्या मुलामुलींना शाळेत प्रवेश देण्यात येवून शैक्षणीक सत्रात समाविष्ठ करुन त्यांना हक्काच्या शिक्षणाचा लाभ मिळवुन द्यावा अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ सप्टेंबर २०२१ पासून आदीवासी प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे असा इशारा मुनाफ तडवी यांनी दिला आहे.

 

Protected Content