खडसे महाविद्यालयात ई-पीक पाहणी व मतदान-आधार कार्ड जोडणी प्रशिक्षण शिबिर  

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी जी. खडसे महाविद्यालयात तहसील कार्यालय, मुक्ताईनगर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ई- पीक पाहणी आणि मतदान व आधार कार्ड जोडणी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे तर प्रमुख शिबिर प्रशिक्षक – तलाठी डी. एन. खैरनार उपस्थित होते.

खैरनार यांनी ई- पीक पाहणी सर्वेक्षण प्रशिक्षण व मतदान आणि आधार कार्ड जोडणी प्रशिक्षण हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून तो राज्याच्या प्रत्येक घराघरांमध्ये पोचला पाहिजे त्यातून जनजागृती होऊन प्रत्येक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन आपली व आपल्या कुटुंबाची उन्नती साधावयाची आहे असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. साळवे यांनी शासनाचे उपक्रम हे कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडवण्यासाठी आयोजित केलेले असतात, त्यामुळे आपण प्रत्येकाने ई -पीक पाहणी व मतदान आणि आधार कार्ड जोडणी प्रशिक्षण घेऊन कुटुंब, समाज आणि राष्ट्राची प्रगती साधली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या शिबिराचे संयोजन तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील तसेच विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके, राष्ट्रीय सेवा योजना महिला अधिकारी प्रा. डॉ. ताहीरा मीर, संगणकशास्त्राच्या विभाग प्रमुख प्रा. राणे मॅडम तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे विभाग प्रमुख प्रा. उद्धव इंगळे यांनी केले.

या शिबिरासाठी मंडल अधिकारी के. के. तायडे तसेच तलाठी अम. पी.दानी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणाल भारंबे, ज्ञानेश्वर पाटील, भूषण पाटील, कृष्णा पाटील, शितल भोई व सांक्षी पाचपांडे इत्यादी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. दीपक बावस्कर यांनी तर सूत्रसंचालन सपना वंजारी आणि आभार प्रदर्शन प्रा. विजय डांगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Protected Content