कोरोना : संशयित ३४ रूग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात १५ व १६ रोजी दाखल झालेल्या ३४ संशयित रूग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.

१५ एप्रिल व १६ एप्रिल रोजी कोविड १९ रूग्णालय, जळगाव येथे घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णापैकी ३४ व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालामध्ये ७ वर्षाच्या मुलीपासून तर ९० वर्षाच्या वृध्दाचा समावेश आहे. तसेच चाळीसगाव येथील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी दिली आहे.

१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात कोविड-१९ संबंधित तपासणी करण्यातसाठी १३० जणांची स्क्रिनिंग करण्यात आली. आत्तापर्यंत २ रूग्ण पॉझिटीव्ह आले होते. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या रूग्णाचा अहवाला १५ दिवसांनतर निगेटीव्ह आल्याने त्याला घरी पाठविण्यात आले आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आजपर्यंत १६६ रूग्ण संशयित म्हणून दाखल होते. त्यातील २६२ जणांचे मेडीकल अहवाल निगेटीव्ह, २ पॉझिटीव्ह, २ रिजेक्टटेड करण्यात आले. कोरोना अहवाला निगेटीव्ह २२८ पैकी १८६ जणांना होम क्वॉरंटाईन म्हणून वैद्यकिय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ हजार ८८४ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.

Protected Content