धक्कादायक : माहिती मिळून देखील राष्ट्रपती जिनपिंग यांनी देशात कोरोना पसरू दिला

बीजिंग (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर ७ दिवस तो व्हायरस राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशात पसरू देत, त्याबाबत कुठेही वाच्यता केली नसल्याची धक्कादायक माहिती चिनी सरकारच्याच अंतर्गत दस्तावेजातून उघड झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

 

कोरोनासंबंधी माहिती १४ जानेवारीला मिळालेली होती. परंतू ७ दिवस कोरोना पसरत असतानाही शी जिनपिंग यांनी अलर्ट जारी केला नाही. एसोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, चिनी सरकारच्या अंतर्गत दस्तावेजातून ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. चीनच्या आरोग्य यंत्रणांनी १४ जानेवारीलाच कोरोना व्हायरसच्या महारोगराईचा आपण सामना करत असल्याचे सांगितले होते. परंतु जिनपिंग यांनी सात दिवस लोकांना सतर्क केले नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने या महारोगराईशी दोन हात करण्याचा कर्मचाऱ्यांना आदेश दिला होता. परंतु वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकांना सतर्क करण्यात आले नाही. अगदी वुहानमधले डॉक्टर्स आणि नर्सेसनी कोरोना व्हायरसचा प्रसार होत असल्याचे संकेत डिसेंबर २०१९ला दिले होते. परंतु अधिकाऱ्यांनी त्या डॉक्टर आणि नर्सेसची तोंडं बंद केली. एवढेच नव्हे तर त्या डॉक्टरांना शिक्षासुद्धा देण्यात आली.

Protected Content