महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ओळखला जाणार भडगावातील ‘हा’ चौक !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच, शहरातील एका चौकाचे त्यांच्या नावाने नामकरण करण्यात आले.

 

 

भडगाव शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता गुरुदत्त चौक खोल गल्ली, शनी चौक, नवनाथ बाबा मंदिराजवळ क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर सायंकाळी तहसील कार्यालय समोरील चौकाला क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक नामकरण फलक अनावरण व मिरवणूक पूजन करण्यात आले.

 

या वेळी तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, बापुजी युवा फाऊंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटिल, ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन, माळी समाज अध्यक्ष अनिल महाजन, महात्मा फुले संस्था अध्यक्ष भिकन महाजन, साहेबराव महाजन, विनोद महाजन, लतिका वाघ, प्राचार्य सुरेश रोकडे, युवा सेनेचे निलेश पाटिल, रविंद्र अहिरे, जाकिर कुरेशी, विजय महाजन, प्रवीण महाजन, नरेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष देवराम महाजन, पत्रकार नितीन महाजन, सागर शिवदास महाजन, रमेश महाजन,गब्बर महाजन, अशोक महाजन, राहुल महाजन, सोपान महाजन, समाधान महाजन, गणेश महाजन, गोकुळ महाजन, अविनाश महाजन, दिनेश महाजन, संतोष महाजन, आप्पा महाजन, सुनील महाजन, सुरेश रोकडे, विनोद महाजन, अनिल महाजन, नाना महाजन, प्रकाश महाजन, रावसाहेब महाजन, संतोष महाजन, अरुण महाजन, नाना महाजन, रितेश महाजन आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅकर रथावर सवाद्य मिरवणूक निघाली. जय ज्योती जय क्रांती च्या घोषणा देतविविध गीतांच्या तालावर समाज बांधवांनी ठेका धरला. झेंडा फिरवला. जल्लोष केला. शहरातील रथ मार्गाने ही मिरवणूक मिरऊन समारोप महात्मा फुले चौकात करण्यात आला.

Protected Content