बोदवड येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या मोहरम पर्वास संदल मिरवणुकीने सुरवात

WhatsApp Image 2019 09 08 at 7.54.37 PM

बोदवड, प्रतिनिधी | हिंदू आणि मुस्लिम बांधवांची एकात्मता दर्शवणारा व एकोपासह जातीय सलोखा राखणाऱ्या मोहरम पर्वास मुस्लिम हिजरी सनच्या मातम व दुःख चा हा मोहरम महिन्याला सुरवात झाली आहे.

या मोहरम ची ७ तारखेला (छडी) सवऱ्या बसवण्याची परंपरा बोदवडला असून सदरच्या चार दिवस चालणाऱ्या या सवऱ्याच्या उत्सवात ७ तारखेला सवाऱ्या शहरात ठिकठिकाणी मांडव टाकून बसवण्यात येतात. चार दिवसाच्या उत्सवांमध्ये पहिल्या दिवशी रात्री शहरातून मिरवणूक काढण्यात येते. दुसऱ्या दिवशी नवस तसेच तिसऱ्या दिवशी कत्तलची रात्र म्हणून अलावा खेळला जातो. चौथ्या दिवशी दुपारपासून शेवटची ताजिया मिरवणूक काढून शहरातील गांधी चौकातील दर्गा परिसरात सुमारे २०० ते २५० पर्यंत सवाऱ्यांची सांगता होते.  सदरचा बोदवड येथील मोहरमचा सवाऱ्या पाहण्यासाठी मध्य प्रदेशच्या खंडवा, बुऱ्हाणपूर,गुजरातच्या सुरत, बडोदा, राज्यातील मुंबई, अकोला, नांदुरा, नागपूर येथून शेकडोच्या संख्येने भाविक शहरात दाखल होत असतात. बोदवडमध्ये सुमारे २५० सवऱ्या दरवर्षी बसवल्या जातात. त्यात सर्वाधिक १४० हिंदूच्या तर ११० मुस्लिम बांधवांच्या सवाऱ्या बसवल्या जातात. त्याची रितसर पोलीस दप्तरी नोंद करून घेतली जाते. सदरच्या सवाऱ्या ह्या ब्रिटिश काळापासून बसवल्या जात असल्याचे रेकार्ड नोंद आहे. तर काही सवाऱ्या ह्या मानाच्या आहेत. त्यांचे भगत मंडळी ही आहे.
प्रत्येक सवारीजवळ भगत वाजनत्री, तसेच मुजावर मंडळी असते.

नवसासाठी होते लाखोंंची उलाढाल

दरवर्षी मोहरमच्या सवाऱ्यांसाठी लाखोंची उलाढाल होत असते. प्रत्येक सवारीला एक सुमारे ऐपत प्रमाणे चांदीचा नाल, अत्तर, लोभान ,अभिर,सुगंधित द्रव यांची मोठी उलाढाल ही होत असते. मोहरम उत्सव साजरा करण्यासाठी सलाम भगत, भास्कर भगत, गुना भगत, नाना भगत, मनोहर भगत, गोपाल भगत, गुरुजी भगत, सुभाष भगत, गुड्डू भगत, सुरेश भगत, गजू भगत, ईश्वर भगत, सुनील भगत, अर्जुन भगत, पप्पू भगत, नयम भगत, सुभान भगत, ताहेर भगत, सलाम भगत, युवराज भगत, मोंटी भगत, बंटी भगत, सुभान भगत, दीपक भगत यांच्यासह बरचेशे भगत या मोहरम उत्सवात मोठया प्रमाणात हजेरी लावत असतात.

Protected Content