Home Cities अमळनेर शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

0
108

अमळनेर प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त येथील ममता विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

येथील ममता विद्यालयात आज दिनांक १९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस.पी.महाले सर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधूंनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात केले असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक एस. पी. महाले यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound