राजवड येथे जागतिक छायाचित्र दिन संपन्न

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील राजवड येथे अमळनेर तालुका  फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने जागतिक छायाचित्र दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

 

जागतिक छायाचित्र दिननिमित्ताने कॅमेरा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी.लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील हे होते.  दोघांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.  याप्रसंगी जेष्ट फोटोग्राफर भगवान पाटील, भगवान वारूडे, मुख्तार आली सय्यद, भास्कर पाटील या मान्यवरांच्या यांनी देखील कॅमेरा पूजन करण्यात आले.  यावेळी कोरोना काळात फोटोग्राफी व्यवसायातील ज्येष्ठ फोटोग्राफर  सोमनाथ ढोमन पाटील व  राजनाथ जयदेव पाटील यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन केले. फोटोग्राफर बंधूंनी आपली मते व्यक्त केली व संघटित का व्हावे ? संघटनेचे  महत्त्व विशद करण्यात आले. यावेळी अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व सन्मानिय सदस्य हजर होते. काल दहीहंडी असल्याने त्यावर आधारित दहीहंडी थीम तयार करून  यश या चिमुकल्या श्रीकृष्ण बनलेल्या बाळाच्या हातून दहीहंडी फोडण्यात आली. सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले तर आभार अनंत पाटील यांनी मानले.

Protected Content