जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेतर मंडळातर्फे जिल्ह्यातील धोबी समाजातील गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
जळगाव जिल्हा धोबी समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेश सुरळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक गणेश सोनवणे, अॅड.ज्ञानेश्वर सुर्यवंशी, माजी सचिव अमर परदेशी, विजय थोरात, सागर सपके, सुरेश ठाकरे, अरुण राऊत यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी राष्ट्रपती पदकप्राप्त पोलीस उपनिरीक्षक प्रदिप चांदेलकर व सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे, रेल्वे विभागातील उत्कृष्ट सेवेबाबत पदकप्राप्त जितेंद्र जाधव, राष्ट्रीय मल्लखांब मार्गदर्शक व राष्ट्रीय पंच गणेश बोदडे यांचा सन्मानपत्र, गौरवचिन्ह व शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच शासकीय कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्जेराव बेडिस्कर, संत गाडगेबाबा युवा फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी प्रभाकर खर्चे, सचिवपदी राजेंद्र सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जेष्ठ समाजसेवक शामराव ठाकरे, शारदाताई वाघ व अमळनेर येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा वाचनालय चालविणारे अध्यक्ष दीपक वाल्हे, डीपीएल स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या समाज ग्रुपचेवतीने प्रातिनिधिक स्वरूपात प्रविण आढाव यांचा शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
एस.एस.सी, एच.एस.सी, पदविका, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम, शासकीय चित्रकला परीक्षेत प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी, तसेच राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू अश्या एकूण ११३ पुरस्कार्थी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने रेवती महाले हिने आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश जाधव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा महाले यांनी तर पुरस्कार्थी यादी वाचन अरुण सपकाळे, गणेश बच्छाव, उमेश्वर सुर्यवंशी यांनी केले. आभार पंकज महाले यांनी मानले. यशस्वीतेसाठी विनोद शिरसाळे, चंद्रकांत वाघ, गणेश सपके, प्रशांत मांडोळे, विजय शेवाळे, मनोज वाघ, सुरेश महाले, किशोर शिरसाळे, संतोष बेडिस्कर, जयंत सोनवणे, भरत वाघ, रवींद्र शिरसाळे, प्रकाश खर्चाणे, सुधाकर कापसे, अनिल वाघ, गौरव शिरसाळे, विनित जाधव यांचे सहकार्य लाभले.