आदिवासी पाड्यावर फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दुर्गम भागात असणार्‍या आदिवासी पाड्यावर ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या माध्यमातून दिवाळी साजरी करण्यात आली.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गरजु आदीवासी गोरगरीबांच्या वस्तींवर ग्रीन प्लॅनेट क्लीन फ्युएल प्रा.ली. अंतर्गत यावल किसान प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने यंदाची दिवाळी आदीवासी गोरगरिबांच्या घरी या विचारा अंतर्गत सामाजिक बांधिलकी म्हणून साजरी करण्यात आली. याच्या अंतर्गत यावल किसान प्रोडयुसर आणि सर्व ग्राम उद्योजकांच्या सहकार्याने गरजू २०० आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ म्हणून शेव चिवडा, मिठाई पॅकेट वाटप करण्यात आली, यामध्ये सावखेडा गायरान ,नागदेवी पाडा, पांढरी वस्ती, आसराबारी वस्ती(धरण) आणि हरिपुरा तांडा या ठिकाणी वाटप करण्यात आली, यावेळी अध्यक्षा सौ. ज्योत्स्ना दिपक पाटील, सल्लागार दिपक गोकुळ पाटील, डायरेक्टर गोकुळ भागवत पाटील, सीईओ हेमंत काशिनाथ पाटील आणि सर्व ग्राम उद्योजक उपस्थित होते.

यात प्रामुख्याने आर.ई.पाटील किंनगाव, मिलिंद महाजन कोरपावली,राजेंद्र महाजन सातोद,सचिन दगडू चौधरी कोळवद,विजय साहेबराव पाटील डोणगाव,सौ.सविता विजय पाटील उंटावद,ज्ञानेश्वर पाटील आडगाव,सौ.रुपाली विकास तळले बामणोद,राजेश वामन महाजन न्हावी,.अतुल तळेले बोरखेडा, किशोर पाटील परसाडे,विनय ब-हाटे पाडळसा,भाग्येश राणे पिंपरुड,हर्षल बोरोले सांगवी,योगेश चौधरी डोंगर कठोरा, सौ.वैशाली योगेश चौधरी चिंचोली,गिरीश देशमुख नायगाव, दिपक खंबायत , शिरसाड,अरुण गोपाळ चौधरी, बोराळे, गणेश पाटील यावल,विशाल चौधरी,हंबर्डी सौ.रत्नमाला गजानन पाटील,कासवा आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content