Home क्राईम फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

0
52

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बळजबरीने काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात घडला आहे.

या संदर्भात तालुक्यातील एका गावातील रहिवासी असणार्‍या २१ वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, ती आपले पती, सासू-सासरे आणि दीर यांच्यासह राहते. तिच्या घराच्या समोरच असणार्‍या वैभव ईश्‍वर चौधरी याने त्या महिलेचा व्हाटसअप क्रमांक मिळवून त्यावरून मॅसेज पाठविण्यास सुरूवात केली. याकडे तिने दुर्लक्ष केला. नंतर सुमारे दोन महिन्यांपूर्वी दुपारी घरात कुणी नसतांना त्याने या महिलेवर अत्याचार केले. याप्रसंगी त्याने महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो देखील बळजबरीने काढून घेतले. यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केले.

दरम्यान, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तो बळजबरीने घरात शिरला. यावेळी त्या महिलेचे कुटुंबिय अचानक घरी आले. याप्रसंगी वैभव चौधरी तसेच त्याचा चुलत भाऊ ऋषी ज्ञानेश्‍वर चौधरी हा देखील हातात लाकडी दांडके घेऊन आला. या दोघांनी सदर महिलेचा पती आणि सासर्‍यांना मारहाण केली. यात हे दोन्ही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधीत महिलेच्या फिर्यादीवरून वैभव चौधरी याच्या विरोधात भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound