जळगाव, प्रतिनिधी । आज जळगाव जिल्हा एन. एस. यु. आय. संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथे २६ जून हा दिवस ‘शहीदों को सलाम दिवस’ म्हणून पाळत राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर सकाळी ११ ते १२ या वेळेत भारत देशाच्या गलवान सिमेवर तसेच जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना दिल्या.
‘सर झुक गये बस उस शाहदत में,
जो शहीद हुए हमारी हिफाजत में…
म्हणत देवेंद्र मराठे यांनी गलवान सिमेवर चिनी घुसखोरांनी बांधकाम करत भारत देशाची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु, आज मोदी गप्प का ? असा प्रश्न उपस्थित केला. जळगाव जिल्हा एन.एस.यु.आय. च्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी केली की, चिनी घुसखोरांनी हडपलेली जमीन तात्काळ परत ताब्यात घेण्यात यावी. तो पर्यंत केंद्र सरकारला काँग्रेस पक्ष स्वस्थ बसू देणार नाही. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष शाम तायडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, रेशन कमिटीचे अध्यक्ष वासुदेव महाजन, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनु.जाती-जमाती अध्यक्ष मनोज सोनवणे, शहराध्यक्ष प्रदीप सोनवणे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद पठाण, उद्धव वाणी, दिपक सोनवणे, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.
भाजपने शहीदांचा केला अपमान : मराठे
देवेंद्र मराठे यांनी भाजप पक्षाने जनसंवाद व्हर्चुअल सभेतून शहीदांचा केला अपमान केला असल्याचा आरोप केला. तसेच ते पुढे म्हणाले की, काल भाजप पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूर येथे जनसंवाद व्हर्चुअल सभा घेण्यात आली. परंतु सभेच्या प्रस्तावना वेळी भाजप पक्षाचे बेअक्कल प्रवक्ते सुरेश हलवणकर यांनी चक्क सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथील शहीद वीर जवान सुनील काळे यांना गलवान सिमेवरील चिनी घुसखोरांविरोधात लढतांना शहीद झाल्याचे सांगितले. परंतु वास्तविक शहीद वीर जवान सुनिल काळे हे २३ जून रोजी जम्म काश्मीर मधील पुलवाम येथे एका अॅन्टी टेरर ऑपरेशन मध्ये शहीद झाले आहेत. म्हणजेच भाजप पक्ष व पक्षाचे डोळ्यांनी व डोक्यांनी अंध प्रवक्ते व भक्त राजकारण करण्यात इतके मग्न झाले की, त्यांना आपल्या देशाचे व राज्याचे वीर जवान कुठे व कोणत्या ठिकाणी शहीद होतात हे सुद्धा माहिती नाही अशा संवेदनाशून्य असलेल्या व शहीदांचा अपमान करणाऱ्या भाजप पक्षाचा देखील आजच्या दिवशी एन.एस.यु.आय. ने निषेध व्यक्त केला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2973136039422232/