शंभर टक्के कर भरल्याप्रकरणी “बिडिओं’चा हस्ते सन्मान

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांडा हद्दीत असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीला थकीत एकूण पावणे तीन लाख रुपयांचा कर भरल्याने त्यांचा गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील दिलीप रामराव चौधरी यांच्या मालकीचे तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत व धुळे रोडवर विराम लॉन्स आहे. त्यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीचे कर थकीत होते. अशात लोकनियुक्त सरपंच अनिता दिनकर राठोड यांनी त्यांच्याकडे वारंवार कर वसूलीबाबत पाठपुरावा केला. अखेर शेवटी दिलीप चौधरी या कर दात्यांनी ग्रामपंचायतीला एकूण २ लाख ८८ हजार पाचशे पन्नास रुपये चेकद्वारे करभरणा केली आहे. त्यामुळे शंभर टक्के करभरणा केल्याप्रकरणी त्यांचा नुकतीच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. व सर्वांनी वेळेवर कर भरून गावाच्या विकासासाठी हातभार लावावा असा मोलाचा संदेश यावेळी त्यांनी दिला आहे. तत्पूर्वी शंभर टक्के करभरणा केल्याने माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी आभार मानले आहे.

Protected Content