जळगाव प्रतिनिधी । रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौदामिनी अपार्टमेंट जवळ बुधवारी भरदिवसा घरातून मोबाईलसह २ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, कुंदा हेमंद गाजरे (वय-४८) रा. गुरूकुल कॉलनी जळगाव हे कामानिमित्त सौदामिनी अपार्टमेंटजवळून जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि २ हजार रूपये रोख असा एकुण ५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश शिंदे करीत आहे.