नगरपालिकेच्या जलवाहिनीवरून टाकळी प्र.दे. येथे पाण्याची चोरी !

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी पाहणी करण्यासाठी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने आज पेट्रोलिंग केली असता आडगावापासून पुढे असलेल्या टाकळी प्र.दे. गावाच्या हद्दीतून गेलेल्या मुख्य जलवाहिनी येथून पाणी चोरत असल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आज शहरातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे पेट्रोलिंग करण्यात आले. त्यात आडगाव गावापासून पुढे असलेल्या टाकळी प्र.दे. गावाच्या हद्दीतून गेलेल्या मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टाकळी प्र.दे हद्दीतून अर्थात ग्रामपंचायतीच्या हद्दीत रामकृष्ण नगरम्हणून पंधरा ते वीस नव वसाहत घरे आहेत. त्या घरांचा ही टाकळी ग्रामपंचायतीच्या मुख्य जलवाहिनीवरून  अनधिकृत नळ कनेक्शन बसवले आहे. त्याच बरोबर काही अॅक्वा प्लॅट व्यावसायिक येथे पहायला मिळले. त्यामुळे अॅक्वा प्लॅट व्यावसायिकांनी हि आपला व्यवसाय जोरात थाटला होता. हे सर्व प्रकार घडत असताना नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग झोपला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

Protected Content