राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किसनराव जोर्वेकर

चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येत असून चाळीसगाव येथील दै.सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी  जिल्हा अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील हे प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पक्षात विविध जणांना सामावून घेतले आहेत. यात चाळीसगाव येथील  दै.सर्वांचा ग्रामस्थचे संपादक, चाळीसगांव तालुका वि.का.सह.ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन व टाकळी प्र.चा.ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच किसनराव जोर्वेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.

सदरचे नियुक्ती पत्र हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव आणि जिल्हयाचे निरिक्षक अविनाश आदीक,चाळीसगांव तालुक्याचे माजी आमदार आणि जळगांव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजीव देशमुख, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ता योगेश देसले, युवक राष्ट्वादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, प्रदेश संघटक नामदेव चौधरी, ओ.बी.सी.सेलचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे , जि.प.सदस्य शशिभाऊ साळुंखे, चाळीसगांव पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, शहर अध्यक्ष श्याम देशमुख,जेष्ठ नगरसेवक रामचंद्र जाधव, रांजणगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जीभाऊ आधार, नगरसेवक दिपक पाटील, सुर्यकांत ठाकूर व रविंद्र चौधरी यांच्या उपस्थित देण्यात आले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!