कोरोना : जिल्हा रूग्णालयात ८ रूग्ण संशयित म्हणून दाखल; दिवसभरात १३० जणांची स्क्रिनिंग

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज नव्याने ८ रूग्ण संशयित कोरोना म्हणून दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात १३० रूग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले त्यातील ८ जणांना संशयित म्हणून दाखल केल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात कोविड-१९ संबंधित तपासणी करण्यातसाठी १३० जणांची स्क्रिनिंग करण्यात आली. आत्तापर्यंत २ रूग्ण पॉझिटीव्ह आले होते. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या रूग्णाचा अहवाला १५ दिवसांनतर निगेटीव्ह आल्याने त्याला घरी पाठविण्यात आले आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आजपर्यंत १६६ रूग्ण संशयित म्हणून दाखल होते. त्यातील २२८ जणांचे मेडीकल अहवाल निगेटीव्ह, २ पॉझिटीव्ह, २ रिजेक्टटेड करण्यात आले तर ३४ जणांचे मेडीकल अहवाल येण्याचे बाकी आहेत.

कोरोना अहवाला निगेटीव्ह २२८ पैकी १८६ जणांना होम क्वॉरंटाईन म्हणून वैद्यकिय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ हजार ८८४ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content