रावेरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

रावेर प्रतिनिधी- येथील जी. एस. कॉलनीत राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

राजेश कैलास न्यायते असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री राजेश याने राहत्या घरात किचनमधील कापडी पडद्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी शव विच्छेदन केले असून पुढील तपास एएसआय आय आय शेख करीत आहे. येथील पोलिसांत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.     

Protected Content