भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर प्रकल्प परिसरातून लोखंडी बीमने भरलेला छोटाहत्ती वाहन असा एकूण १ लाख १८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याची घटना शनिवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे विद्युत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्प परिसरातील एका छोटाहत्ती वाहन क्रमांक एमएच १९ एस ६७८७) मध्ये काही लोखंडी बीम ठेवण्यात आले होते. दरम्यान शनिवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता लोखंडी बीमसह छोटाहत्ती वाहन संशयित आरोपी नसीर शहा जनाब शहा फकीर वय-२७, रा. शहीद चौक फेकरी ता. भुसावळ आणि सोपान रामदास भुसारी वय-३३, रा. निंभोरा ता. भुसावळ या दोघांनी चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर दिपनगर प्रकल्पाचे सुरक्षा अधिकारी भैय्यासाहेब मोरे यांनी भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे हे करीत आहे.