जळगाव प्रतिनिधी । जुने भांडणाच्या कारणावरून दोन भावांनी शिवीगाळ करून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीत घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिवान भिकमचंद थोरानी (वय-५१) रा. सिंधी कॉलनी यांचे रेडीमेडचे दुकान आहे. त्याच्या घराच्या शेजारी भारत कुकरेजा व शंभू वसंतदास बलभानी यांच्यासह इतर ८ यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल केली होती. याचा मनात राग धरून २ मार्च रोजी संशयित आरोपी शंभू वलभानी आणि त्याचा भाऊ अजित वलभानी, राकेश हटकर, विठ्ठल हटकर यांनी गल्लीतील मोहित राजकुमार यांच्या घरासमोर शिवीगाळ केली मात्र याप्रकरणी पोलीसात कोणताही गुन्हा दाखल केलेला नव्हता.
४ मार्च रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी दिवान थोरानी आणि त्यांचा भाऊ नंदकुमार भिकचंद थोरानी हे दुकानाचे काम आटोपून घरी येत असतांना भावाला घरी सोडले त्यावेळी परीसरातील मोहित कोरवानी, दिपक सटाणा, नंदलाल थोरानी, रवि रूपचंद कटारिया, राहल खेलवानी, सोनी नंदलाल थोराणी व इतर लोक चर्चा करत असातंना समोरून संशयित शंभू उर्फ सुमित वलभानी व त्याचा भाऊ अजित वलभानी यांनी मागील भांडणाचे कारण काढून सर्वांना शिवीगाळ केला. याला आवराआवर करत असतांना फिर्यादी दिवान गेला असता संशयित शंभू याने खिश्यातील चाकू काढून दिवान यांच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. तर अजित यांने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत दिवान यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी संशयित आरोपी शंभू वलभानी आणि त्याचा भाऊ अजित वलभानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल वाठोरे करीत आहे.