भरधाव कारच्या धडकेत वरणगावचा विद्यार्थी ठार; चालकास अटक

भुसावळ प्रतिनिधी । महाविद्यालयातून मित्रांसोबत घरी येत असतांना मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास वरणगाव येथे घडली. दरम्यान कार चालकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, रोहित सुनिल इंगळे (वय-१५) रा. वरणगाव हा फुलगाव येथे आयटीआयचे शिक्षण घेत होता. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास महाविद्यालयात गेला. महाविद्यालयातील लेक्टर आटोपून मित्रासोबत दुचाकीने घरी परतत असतांना सकाळी १० वाजता गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ०९९०) जोरदार धडक दिली. यात रोहित जागीच ठार झाला तर सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान अपघात झाल्यानंतर नागरीकांना घटनास्थळी एकच धाव घेतली होती. नागरीकांना कारचालकाला पोलीसांच्या हवाली केले आहे. आयुधनिर्माणी कारखान्यात नवीन मशीन फ्रान्समधून मागावण्यात आल्या आहे. त्या मशीनरी बसविण्यासाठी फ्रान्समधून काही टेक्नीशियन्स हे जळगावला आले होते. जळगावकडून वरणगावमार्गे आयुधनिर्माणीकडे जाणाऱ्या कारने जात होते. वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीसात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content