धक्कादायक : गुजरातमध्ये दोन वर्षात १५ हजारांपेक्षा जास्त नवजात बालकांचा मृत्यू

अहमदाबाद (वृत्तसंस्था) गेल्या २ वर्षात गुजरातमध्ये १५ हजारांपेक्षा जास्त नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस आमदाराने याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री नितीन पटेल यांनी उत्तर दिले. राज्यात 1.06 लाख नवजात बालकांना सन 2018 व 19 या कालावधीत केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी 15,013 बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच, 1.06 लाख नवजात शिशूंपैकी 71,774 बालकांचा जन्म हा सरकारी रुग्णालयात झाला होता. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अहमदाबाद येथे सर्वाधिक 4,322 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, वडोदरा (2,362) आणि सुरतमध्ये (1,986) चिमुकल्यांनी आपला जीव गमावला आहे.

Protected Content