जन्मदात्यांच्या उपकाराची जाणीव ठेवणारे किती आहेत ? ; आ भोळे यांची खंत

 

यावल  : प्रतिनिधी । आई वडील  आयुष्यात आपली प्रगती व्हावी म्हणून त्यांचे जीवन खर्ची घालतात पण  त्यांच्या  आभाळकष्ट व उपकाराची आज जाणीव किती लोक ठेवतात ?  असा प्रश्न विचारत आ राजुमामा भोळे यांनी खंत व्यक्त केली

यावल येथे अनौपचारिक चर्चेत एका कौटुंबिक भेटीत ते बोलत होते  .

 

भाजपच्या यावल शहर व परिसरात गठीत करण्यात आलेल्या शाखा  उद्घाटन  कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यावल येथे आले होते  त्यांनी यावलचे नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांच्या निवासस्थानी भेट दिली  डॉ . कुंदन फेगडे यांचे वडील सुधाकर फेगडे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित   अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधुन ते बोलत होते

 

यावेळी त्यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे , भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील , माजी तालुकाध्यक्ष डॉ . नरेन्द्र कोल्हे , शहराध्यक्ष डॉ .निलेश गडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांच्यासह सुधाकर फेगडे , डॉ . कुंदन फेगडे , डॉ .सौ .  जागृती फेगडे यांच्यासह आदी उपस्थित होते .

 

Protected Content