डोणगाव किनगाव रस्त्याच्या दुरवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष ; दुरुस्तीची मागणी

 

  यावल  : प्रतिनिधी  ।  तालुक्यातील किनगाव ते डोणगाव  या  तीन किलोमिटरच्या रस्त्याची खड्ड्यांनी  चाळण केली आहे.  सार्वजनीक बांधकाम विभागाचा कोणीही  अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील शेतकरी  व ग्रामस्थ  संतापले  आहेत.

 

या मार्गावरून यावल ते (डोणगाव मार्गे) जळगावकडे  एस टी च्या  दहा ते बारा बसफे-या होतात किनगाव हे पंचक्रोशीतील मुख्य बाजारपेठ असल्याने डोणगावकरांसह डांभुर्णी, उंटावद व परीसरातील बहुतेक खाजगी वाहने कमी अंतराचा रस्ता असल्याने याच रस्त्यावरून वापरतात मात्र या रस्त्याची अवस्था  दयनीय झाली आहे

या रस्त्यावरून  पायी चालणेसुध्दा कठीण झाले आहे या रस्त्याची किरकोळ दुरूस्ती ब-याचदा केली गेली मात्र काहीही उपयोग झाला नाही या रस्त्याची  रूंदी कमी असल्याने समोरून मोठे वाहन येत असतांना बाकी वाहनांना रस्त्याच्या बाजुला उभे रहावे लागते याच रस्त्यावर इंग्लिश माध्यमाचे  निवासी पब्लिक स्कूल आहे  स्कुल बसेसही याच रस्त्यावरून ये जा करतात  डोणगावहुन शिक्षणासाठी यावल व किनगावला विद्यार्थी जातात  जास्त  रहदारी असल्याने हा रस्ता नवीन तयार होणे आवश्यक होते मात्र त्याची साधी दुरूस्तीही झाली नसल्याने डोणगावच्या ग्रामस्थासह या रस्त्यावरून वापरणारे वाहनधारकही तिव्र नाराजी व्यक्त करत आहेत. सार्वजनिक  बांधकाम विभागाच्या  अधिकाऱ्यांना  लोकप्रतिनिधींनी जाब विचारावा व हा रस्ता लवकर नवीन बनवावा अशी  मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Protected Content