महात्मा फुले महामंडळातील घोळ : धागेदोरे भुसावळात

भुसावळ प्रतिनिधी । महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात तब्बल साडेसहा कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे धागेदोरे भुसावळात असल्याचे निष्पन्न झाले असून यात अटक करण्यात आलेल्या संशयिताच्या घराची पोलिसांनी झडती घेतली.

याबाबत वृत्त असे की, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात तब्बल साडेसहा कोटी रूपयांचा घोळ झाल्याचे उघडकीस आले असून याबाबत आर्थिक गुन्हा शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. बोगस लाभार्थी दाखवून बीज भांडवल योजनेत हा अपहार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आतापर्यंत महामंडळाचे व्यवस्थापक खंडू विठोबा लोहकरे; अकाऊंटंट सागर वसंत अडकमोल; सुनंदा बाबूराव तायडे; प्रकाश लक्ष्मीकांत कुलकर्णी, अमरीश अनिल मोकाशी आणि संजीव वसंत सोनवणे यांना अटक करण्यात आलेली आहे. तर, मुकेश देवराम बारमासे याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

दरम्यान, या प्रकरणात भुसावळ येथून संदीप प्रभाकर साबळे याला अटक करण्यात आली असून शुक्रवारी त्याच्या गणेशनगरातील घराची झडती घेण्यात आली. यामुळे आता या अपहार प्रकरणाचे धागेदोरे भुसावळात पोहचल्याचे दिसून आले आहे.

Protected Content