मोहराळे येथे राष्ट्रीय पुणे पथकाकडून पुन्हा सिरो सर्वेक्षण व नमुने संकलन

यावल ( प्रतिनिधी )। तालुक्यातील मोहराळे येथे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( l.C.M.R.) पथक पुणे यांनी मोहराळे ता.यावल येथे पुन्हा दोन महिन्यानंतर सिरो सर्वेक्षण-२ करून ४१ नमुने घेण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १० गावाची निवड करण्यात येऊन यावल तालुक्यातून मोहराळे या गावाची निवड करण्यात आलेली होती.

भारतातील समुदायामध्ये कोरोना ह्या विषाणूचा प्रसाराच्या कक्षा समजावून घेणे ( प्रसार किती झाला आहे ) आणि SARS-C०V-2 ( सार्स-करोना ) संक्रमणाचा कल जाणून घेणे ह्या हेतूने हे सर्वेक्षण ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद पुणे” आयसीएमआर या संस्थेकडून करण्यात आले.

गावातील सर्वेक्षणासाठी चार दिशातील घरांची निवड करण्यात येऊन त्यांचे सर्वेक्षण करून निवड झालेल्या घराची व घरातील १० वर्षावरील निवड झालेल्या व्यक्तींचे रक्ताचे ४१ नमुने पोलिसांच्या उपस्थितीत घेण्यात आले.

या सर्वेक्षणातून आपल्याला लोकसंख्येच्या वेगवेगळ्या गटामध्ये तसेच पुरुष-स्त्री ह्या दोन लिंगामध्ये किती प्रसार झाला आहे आणि ज्या दराने काळानुसार नवीन संक्रमण (केसेस) होत आहे हे समजून घेण्यास मदत होणार आहे. यामधून उपलब्ध होणारे ज्ञान कार्यक्रम व्यवस्थापन यांना संसर्गाचा प्रसार रोखण्यास आणि नियंत्रण ठेवण्यासाठी व मार्गदर्शक तत्त्वे बनवण्यासाठी मदत होणार आहे.

ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, प्रा. आ. केंद्र सावखेडासिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व I.C.M.R. चे प्रतिनिधी प्रथमेश चव्हाण यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सिरो सर्वेक्षण व नमुने संकलन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. आ. केंद्र सावखेडासिम ता. यावल येथील वैद्यकीय पथकात डॉ. गौरव भोईटे ,एल जी तडवी, अरविंद जाधव, राजेंद्र बारी, बालाजी कोरडे, माया संदांशिव, जुगरा तडवी, शोभा जावळे, शिवप्रताप घारू, शोएब व आशासेविका निर्मला पाटील, योगिता पाटील, कल्पना पाटील आदी होते. शिबिरात ग्रा.पं.चे वासुदेव पाटील, हरी पाटील, संजय पाटील व बाळू महाजन यांचे सहकार्य लाभले.

Protected Content