Home Cities यावल यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी ४५ अर्ज दाखल

यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी ४५ अर्ज दाखल

0
68


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सहकार क्षेत्रात कार्य करणार्‍या येथील यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी ७५नामनिर्दशन अर्ज विक्री झाले असुन,४५ उमेदवारांनी आपले नामनिर्दशन अर्ज दाखल केले आहे.

यावल खरेदी विक्री सहकारी संघाची दिनांक ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामर्निदेशन चौथ्या दिवशी ७३ अर्जाची विक्री झाली असुन,४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत एकुण १७ संचालक निवडीसाठी २८ हजार७३ मतदार व सहकारी सोसायटीचे ४८ मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

नामर्निदेशन अर्ज साठी दुय्यम निबंधक सहकार संस्था कार्यालय यावलचे मुख्य लिपिक के व्हि पाटील हे कामकाज पहात असुन ,या निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे हे काम पहात आहे. दरम्यान ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी काही राजकीय मंडळी प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे.


Protected Content

Play sound