मालमत्ता कवडीमोल भावात घेण्यासाठीच कंडारेला आणले — ऍड विजय पाटील

जळगाव : प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कवडीमोल भावात घेण्यासाठीच अवसायक म्हणून कंडारेला आणले गेले , असा सनसनाटी आरोप आज  ऍड विजय भास्कर पाटील यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन  यांच्यावर केला . 

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याला आज पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने नाशकात अटक केल्यावर यासंदर्भात बोलताना ऍड विजय भास्कर पाटील पुढे म्हणाले की , गेल्यावर्षीच्या २७ नोव्हेम्बरपासून पोलीस सुनील झवरच्या मागावर होते १० महिन्यांपासून तो फरार होता या पतसंस्थेच्या कार्यालयात जे संगणकाचे  सॉफ्टवेअर होते तेच आणि तसेच   सॉफ्टवेअर सुनील झवरच्या कार्यालयातसुद्धा होते तो बसल्या जागी सगळ्या गोष्टी हाताळत होता त्यामुळे या घोटाळ्याचा खरा सूत्रधार तोच होता आणि त्याला गिरीश महाजन यांचा आशीर्वाद होता कंडारेशी झालेल्या  डीलमधून झवरने हजार कोटींच्या या पतसंस्थेच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या अगदी अवघ्या १० टक्के किमतीत या मालमत्ता मिळवल्या २० वर्षांपूर्वी साधा आरटीओ एजन्ट असलेला झंवर आतापर्यंत ५ ते ७ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तांचा धनी कसा झाला ? हे समोर आले पाहिजे सुनील झवरच्या नावावर असलेल्या मालमत्ता खऱ्या गिरीश महाजनांच्या आहेत महाजनांच्या  आशीर्वादाने हा घोटाळा झालेला आहे त्यामुळे अत्यंत योग्य पद्धतीने पोलीस तपास झाल्यास या घोटाळ्यात  गिरीश महाजनही मोठे आरोपी ठरू शकतात   नाशिकचे माजी पालकमंत्री कोण होते ? सुनील झंवरने नाशिक जिल्ह्यात किती मालमत्ता घेतल्या ? त्याने नाशिक जिल्ह्यात घेतलेल्या १०० कोटींच्या मालमत्तेच्या व्यवहाराबद्दल तर एकनाथराव खडसे यांनी राज्य सरकारकडे तक्रार करून हा व्यवहार रद्द करावा अशी मागणी केली आहे  झवरला ती मालमत्ता महाजनांमुळे मिळाली होती बऱ्याच मालमत्ता फक्त झवरच्या नावावर आहेत पण खरे मालक  महाजनच  आहेत  माझे  अपहरण करून मला पुण्यात ज्या फ्लॅटमध्ये ठेवलेले होते तो फ्लॅटसुद्धा झवरचाच होता तो गुन्हा पुण्यात दाखल आहे सगळ्या पुढाऱ्यांना असे लोक सोबत लागतातच कारण त्यांना स्वतःच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता जमवता येत नाहीत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मालमत्ताचा तपशील जाहीर करावा लागतो त्यामुळे पुढाऱ्यांसाठी अशा एक प्रकारे बेनामी मालमत्ता घेणारे असे पोसले जातात झवरच्या अटकेमुळे आता चांगला तपास झाला तर या पतसंस्थेच्या कर्जदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्ता यांनी ठरवून मातीमोल भावात मिळवल्या या गुन्ह्याचा चांगला तपास झाला तर  आणखीही त्यांचे गुन्हे उघडकीस येऊ   शकतात कंडारेला अवसायक पदावर या मालमत्ता मिळवण्यासाठीच आणले गेले होते आता मी त्रयस्थ अर्जदार होणार असून झवरला जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करणार आहे  या घोटाळ्याच्या तपासात यापुढे राजकीय दबाव आला नाही तर महाजनसुद्धा अटकेत जातील या कवडीमोल भावात मिळवलेल्या मालमत्ता झवरने कोर्टाकडे जमा केल्या तर त्यातून ठेवीदारांचे पैसे कसे द्यायचे ते कोर्ट ठरवू शकते ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग  करणारेच खरे गुन्हेगार आहेत पुण्यात कोथरूडला दाखल गुन्ह्यात मी पाठपुरावा करतोय या पतसंस्थेच्या गुन्ह्यात आता जामीन  मिळाला तरी माझ्या गुन्हयात कोथरूड पोलीस पुन्हा सुनील झवरला ताब्यात घेऊ शकतात , असेही त्यांनी सांगितले . 

 

 

Protected Content