अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंकलेश्र्वर-बुऱ्हाणपुर राज्य मार्गावरील हंबर्डी गावाजवळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण झाली गंभीर जखमी झाले होते. प्राणी मित्रांसह वनविभागाच्या कार्यतत्परतेमुळे जखमी हरणाचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.

अधिक माहिती अशी की, यावल पुर्व क्षेत्राच्या वन विभागा मिळालेल्या माहीती वरून सकाळच्या सुमारास मौजे हंबर्डी ता. यावल गावाजवळ बर्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर अज्ञात वाहनाचे धडकेत चितळ हरिण वन्यप्राणी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना १५ जानेवारी रोजी घडली होती. यावेळी घटनेची माहिती दुरध्वनी व्दारे वनविभागास कळविण्यात आली. त्यानुसार उपवनसंरक्षक विवेक होशिंग, प्रथमेश हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक यावल, यांचे आदेश व मार्गदर्शनाने यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर , .रविंद्र तायडे ( वनपाल डोंगरकठोरा ) , राजेंद्र खर्चे (वनपाल), .भैय्यासाहेब गायकवाड (आगरवनरक्षक यावल ), तसेच वनर्मचारी अशोक माळी, .पंढरिनाथ बारी, महेश चव्हाण ,शरद पाटील, यांनी तात्काळ माहीती प्राप्त होताच हंबर्डी येथे घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण गंभीर जखमी झाले होते. वन्यप्राणीस हंबर्डी गावातील वनप्राणी मित्र आणी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी हरणास ताब्यात घेत शासकीय वाहनाने यावल येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आर.सी. भगुरे यांचे निरीक्षणात औषध उपचार करण्यात येत आहे. याप्रसंगी घटनास्थळी मनोज रामदास असत्कर, अमोल निबाळे फैजपूर,. धनराज पुरुषोत्तम तळेले, याकूब तडवी,इतबार तडवी,विलास तायडे उपस्थित होते.

Protected Content