जळगाव, प्रतिनिधी । जनमत प्रतिष्ठानच्यावतीने आज नवीन बस स्टॅन्डमध्ये कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आज सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डेपो मॅनेजर प्रथमेश बोरसे, आगर व्यवस्थापक निलेश पाटील, आगारप्रमुख माणूस तिवारी, वाहन परीक्षक मनोहर मिस्तरी, वरिष्ठ लिपिक सारिका वैद्य, लिपिक रत्ना भोई यांना सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पूर्ण बस स्टँड परिसरातील आवारामध्ये व बसेस वर मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा असे फलक लावण्यात आले यावेळी जनमत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकज नाले, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे विजय लुळे, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे हर्षल पाटील, सागर कोळी आदी उपस्थित होते