महागडे दोन चोरीचे मोबाईल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोलीजवळील वॉटर पार्कच्या लॉकर्समधून महागडा मोबाईल लांबविणाऱ्या संशयिताला बांभोरी बसस्थानक येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केले आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या झुलेलाल वाटरपार्क येथील लॉकरमधून एकाचा महागडा मोबाईल लांबविल्याची घटना घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी भुषण नथ्थू बडगुजर हा एरंडोल तालुक्यात कढोलीत चोरीचा मोबाईल विक्री करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम , पोहेकॉ जितेंद्र पाटील, अक्रम शेख याबुक, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, राहूल बैसाणे, भारत पाटील यांनी भुषण नथ्थू बडगुजर (वय-२३) रा. कंडोली ता. एरंडोल याला धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथून अटक केली आहे.

त्यांच्याकडून १६ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल हस्तगत केले असून पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content