‘जनता कर्फ्यू’मध्ये ‘स्वयंस्फूर्तीने’ सहभागी व्हा : रवींद्र पाटील

यावल (प्रतिनिधी) कोरूना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी केली आहे.

 

यासंदर्भात आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी म्हटले आहे की, आपल्या देशात विषाणू बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून शासन व प्रशासन याचा सामना करत आहे. त्यातच आपले जिल्ह्यातील आरोग्य विभागातील संपूर्ण डॉक्टरांची टीम अहोरात्र या विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सक्रिय झाली आहे. प्रत्यक्षात या विषाणूला घाबरण्याचे कारण नाही, मात्र एक आपली जबाबदारी म्हणून आपण स्वतः आपली खबरदारी घेतली पाहिजे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे आपण टाळावे, असे आवाहन सभापती रविंद्र पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी देखील हे गांभीर्य घेऊन कोणतेही खास कार्यक्रम आयोजित करू नये तसेच आयोजित कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याची आपण खबरदारी घ्यावी. लोक प्रतिनिधी म्हणून स्वतः शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित देणार नाहीय. नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यु’मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कोरोनाशी लढा द्यायचा आहे. तरी नागरिकांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घरा बाहेर न पडता घरात बसून रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण,क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी केले आहे.

 

जिल्हा परिषदमध्ये येण्यास टाळावे

31 मार्च पर्यंत कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये येण्यास नागरिकांनी टाळावे ज्या आपल्या समस्या असतील त्या फोन द्वारे आपण कळवू शकता गरज नसल्यास जिल्हा परिषदेत येऊ नये.

 

बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करूनच गावात शिरावे

आपल्या घरातील नातेवाईक जे मुंबई पुणे इतर ठिकाणाहून आपल्या गावात आले असतील तर त्यांनी आरोग्य विभागाशी तात्काळ संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घेण्यात यावी. यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयांमध्ये याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content