खळबळजनक : धरणगावात आढळला दुसरा कोरानाबाधित रूग्ण

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील खत्री गल्ली परिसरात आज दुसरा कोरानाबाधित रूग्ण आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या वृत्‍तास प्रातांधिकारी विनय गोसावी यांनी दुजोरा दिला असून संबंधित परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

पहिली कोरोनाग्रस्त महिला व्हेंटीलेटरवर
पहिल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील १७ सदस्य क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना धरणगाव येथील अधिग्रहीत करण्यात आलेल्या वसतीगृहात ठेवण्यात आले आहेत. त्यांचे स्वॅब सँपल घेण्यात आले असून ते धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अद्यापपर्यंत सर्वांचे तपासणी अहवाल येण्याचे बाकी आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान आज कारोनाबाधित महिलेच्या कोणकोण संपर्कात आले आहे याची माहिती घेतली जात या महिलेच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे कळते. ही माहिती मिळाल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने परिसरात फवारणी करून निर्जतूकीकरण करण्याचे काम सुरू आहे. खबरदारी म्हणून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावीसह प्रशासन उपाययोजना सुरू आहेत. कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने पुढील परिस्थीती सुधारण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे. धरणगावात सलग दुसरी महिला कोरोना बाधित आढळून आल्याचे गावातील नागरीकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content