जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा तीनशेच्या उंबरठ्यावर; नवीन १८ रुग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ९४ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १८ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आता कोरोनाबधितांचा आकडा ३०० च्या उंबरठ्यावर आला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील दक्षतानगर, शाहूनगर, आर. आर. हायस्कुल परिसर याठिकाणचे ११, साईनगर, भुसावळ येथील ३, भडगाव येथील १, पाचोरा येथील १ व कोरपावली ता. यावल येथील २ रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २९७ इतकी झाली असून त्यापैकी ७७ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तेहतीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Protected Content