भुसावळातील मृत्यूंजय तरूण मंडळाच्या अनोख्या उपक्रमाचे कौतूक

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात कोरोनोचा फैलाव अधिक प्रमाणावर वाढत आहे. खबरदारी म्हणून शहरातील ‘मृत्युंजय तरुण मंडळ’च्या कार्यकर्त्यांनी ऑटोमॅटिक सॅनेटायझेशन व तापमान तपासणी कीट नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे.

मृत्युंजय तरुण मंडळाच्यावतीने नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी म्हटले आहे .
या मशीनमुळे ॲटोमॅटिक तीन सेकंदात व्यक्तीचे सॅनेटायझेशन होऊन त्याच्या शरीरातील तापमानाची तपासणी होईल. जर एखाद्याच्या शरीरातील तापमान ४० अंशापेक्षा जास्त असल्यास सायरन वाजेल अशी माहिती आ.सावकारे यांनी सांगितले. तरूण मुले सामाजिक कार्यात किती पुढे आहे? हे मृत्युंजय मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचेही आ.संजय सावकारे यांनी केले.

यावेळी अध्यक्ष रवी ढगे, चेतन सरोदे, जितेंद्र पाटील, डॉ. किशोर बेंडाळे, विकास पाचपांडे, नगरसेवक पिंटु कोठारी, दिनेश नेमाडे पुरूषोत्तम नारखेळे, अनिल भोसले आदी उपस्थित होते. उपक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बेंडाळे, गुडू बडे, नितीन इंगळे, भुषण पाटिल, विजय बोरोले,गौरव बोरोले, पिन्टू काळे, भावेश ढगे, केतन सरोदे यांची परिश्रम घेतले.

Protected Content